Sadguru Vishnudas Maharaj
मुख्य पृष्ट प्रस्तावना अभिप्राय सद्गुरु श्री विष्णुदास महाराज माहात्म्य आरती चित्र दालन चित्र फिती संपर्क
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४
२५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७


अध्याय क्र. 42
गरुड रुप घेऊनी । केले तप औदुंबरी ॥ तप ते यशासाठी । साक्षात्कार अविनाशसी ॥


श्री गणेशाय नम: । श्री गुरुभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: । श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: ॥ गुरु श्री. चैतन्य मूर्ती । दिनरात चैतन्य अंगी ॥ उत्साह रोमरोमी । दत्त अवतारी ही मूर्ती ॥1॥ काळवेळ न त्यासी । केव्हाही या दर्शनासी ॥ प्रत्येकाचे प्रश्न भिन्नचि । योग्य मार्गदर्शन प्रत्येकासी ॥2॥ रडार विमान तळी । घेई नोंद प्रत्येक विमानी ॥ तसेच गुरु शक्तीतूनी । अचूक उत्तरे त्याचे त्यासी ॥3॥ प्रसन्नता दिनरात मनी । प्रसन्नतेतून सर्व कांही ॥ पाहता प्रसन्न मूर्ती । दर्शने होतो प्रसन्न मनी ॥4॥ दगडाची मूर्ती देऊळी । उभी असते मंदिरी ॥ तसेच ही गुरु मूर्ती । कंटाळा नसे भक्तासाठी ॥5॥ कोठूनी येते शक्ती । अदृश्य सृष्टी कार्य निश्चिती ॥ कसे काय कोठूनी । सांगणे कठीण या क्षेत्री ॥6॥ जरी वय श्याहएेंशी । उन्हाळा न सोसवी ॥ थकवा अत्यंत शरीरी । तरी चर्चा सतत भक्तासी ॥7॥ कोणा न कळे त्यातूनी। गुरु असती आजारी ॥ प्रत्येकाचे समाधान होऊनी । परत जाती दत्तवाडीहूनी ॥8॥ अनुभव सतत प्रत्येकी । ज्याचे त्याला देती ॥ सर्वाभूती लक्ष क्षणोक्षणी । वर्णना पलीकडे सर्व ॥9॥ अनुभव उपाय त्यावरी । श्रध्दा मूळ असे जरी ॥ लीन होऊनी गुरु चरणी । गाऊ द्या या अध्यायासी॥10॥ गुरु हेच परब्रह्म । गुरु हेच दत्त ॥ गुरु हेच सर्वस्व । गुरु प्रेम अतूट ॥11॥ गुरु भेट होण्यासी । कारण पाहिजे प्रबलचि॥ मन नाजूक संकटी । मनी संस्कार योग्य या वेळी ॥12॥ अविनाश देशपांडे नामी । एक शिष्य अकोल्यासी ॥ वडील सदाशिव असती । माता सुशिला त्यांची ॥13॥ कोण जाणतो संचितासी । फल येते नशिबी ॥ हे सत्य तत्त्व जीवनी । घटने कळते त्यासी ॥14॥ टाळता न टळे तेही । कर्माची अजब गती ॥ क्षणात घडे सर्वही । पूर्व सूचना न उपयोगी ॥15॥ घटना लग्नानंतरी । गुरुवार भानुदये उठूनी ॥ पूजा केली दत्तात्रेयाची। कार्यालयी प्रारंभ कार्यासी ॥16॥ घटना घडली एकदमचि । अविनाश कॉऊंटरवरती ॥ अपरिचित व्यक्ती कोणी । चोरी केली त्यांनी ॥17॥ फ्रॉड म्हणती आंग्लभाषी । मराठीत म्हणा चोरी ॥ फसवणूक म्हणा त्यासी । घडले मात्र निश्चित ॥18॥ रक्कम नसे लहान सहान। पंचाएेंशी हजाराचा फ्रॉड ॥ धाबे दणाणले सर्व । संकटी कोणी न साथी ॥19॥ ग्रह बल नाही म्हणून । ऐकण्या न कोणी तयार ॥ आरोप आला त्यावर । निलंबीत केले कामावरुन ॥20॥ बँकेचे अधिकाऱ्यासी । विश्वास न त्याचेवरी ॥ तक्रार नोंदविली त्यांनी । पोलीस कार्यालयी ॥21॥ पोलीसांची रीत आगळी । छडा लावण्याची पध्दती ॥ नित्य मारहाण करिती । कबूल करण्या सांगती ॥22॥ चोरीच नव्हती केली । कबूल कसे मारुनी ॥ कबूली नाही म्हणूनी । पोलीस कस्टडी त्यासी ॥23॥ कस्टडी नसे एकदिनी । पंधरा दिवस कस्टडी॥ त्या हाल अपेष्टेसी। वर्णन नाही शब्दी ॥24॥ ऐशा प्रयत्नातूनी । गुन्हेगारी येते हाती ॥ ऐशी प्रथा त्यांची । दोष न त्यांचा कांही ॥25॥ अविनाश आरोपी । संशय होता त्याच्यावरी ॥ कबूल करणे अशक्यचि । त्याने कष्ट अधिक ॥26॥ सहन करणे कठीणचि । श्रध्दा गुरु दत्तात्रेयावरी ॥ सहन करण्या शक्ती । दिली गुरु दत्तात्रेयांनी ॥27॥ अश्रू येती रोज नयनी । काटे येती अंगावरी ॥ कोणते संचित फळासी । काही न कळे मनासी ॥28॥ गुरुचरित्र पठण मती । ढळली नाही अशा संकटी ॥ शक्ती मिळाली मनी । धैर्य मिळाले वेळोवेळी ॥29॥ पोलीस केस न्यायालयी । सुरु झाली चक्री ॥ जावे तारखेवरी । बदलून मिळे दुसरी ॥30॥ वकील न उत्सुक कोणी । यश नाही म्हणती ॥ नकार प्रत्येक कार्यी । सहानुभूती शून्यता कुठेही ॥31॥ सूचेना मना काही । कुंडली अनेका दिली ॥ बिकट काल आजी । भविष्याची काय खात्री ॥32॥ अनेकाकडे जाऊनी। समाधान नाही मनासी ॥ खात्री न यशाची । भाव फक्त दत्तात्रेयावरी ॥33॥ ऐकले होते कानी । गुरु येती शेजारी ॥ भेटी नव्हती आधी। योग नव्हता आधी ॥34॥ अकोल्यासी शिष्या घरी । गुरु येती कितीवेळी ॥ इच्छा न झाली कधी । दर्शना न गेले कधी ॥35॥ योग आल्यावाचून। सत्पुरुष दर्शन अशक्य ॥ काळवेळ आल्यावाचून । मार्गदर्शन अशक्य ॥36॥ योगायोग म्हणा तुम्ही । अदृश्य सृष्टी योजना ती ॥ विद्युत बील देण्यासी । दोघेही कसे एक क्षणी ॥37॥ प्रेरणा अविनाश मनी । विचारिले शिष्यासी ॥ गुरु येती तुझ्या घरी । इच्छा आहे दर्शनाची॥38॥ गुरु आले चवथे दिनी । निरोप शिष्या कडूनी ॥ दर्शना आले सर्वही । खात्री वाटली यशाची ॥39॥ अरिष्ट कथिले गुरुसी । विनंती केली सुटकेची॥ द्रवले गुरुचे मन अंतरी । उपाय सुचविला तात्काळ ॥40॥

 

Sadguru Vishnudas Maharaj