Sadguru Vishnudas Maharaj
मुख्य पृष्ट प्रस्तावना अभिप्राय सद्गुरु श्री विष्णुदास महाराज माहात्म्य आरती चित्र दालन चित्र फिती संपर्क
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४
२५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७


अध्याय क्र. 32
शब्द 'महादेवाची' पिंड ही । दिसते आहे मस्तकी ॥ अखंड तेजाचा शिरावर । होत आहे अभिषेक ॥


श्री गणेशाय नम : । श्री गुरुभ्यो नम :। श्री कुलदेवताभ्यो नम: । श्री महालक्ष्म्यै नम:। श्री सरस्वत्यै नम :॥ गुरु माहात्म्य काय वर्णू । कसे वर्णू किती वर्णू ॥ कोठूनी शब्दासी आणू। मती कोठूनी आणू ॥1॥ बुध्दी देणार गुरु । वर्णन करविता गुरु॥ घडविणार सर्व गुरु । कर्ता करविता गुरु॥2॥ परब्रह्म आणती गुरु । मोक्ष देण्या समर्थ गुरु ॥ अनुभव देण्या समर्थ गुरु । कर्म दग्ध करिती गुरु ॥3॥ नित्य नैमित्तिक अनुष्ठानही । दत्तवाडीसी सदा असती ॥ प्रत्येका वाटते मनी । भाग घ्यावा यामध्यी ॥4॥ अनुभव विमानी चढण्याची । सर्वाच्या मनी घाई ॥ कोणी करिती पारायणासी । कोणी सदा गर्क सेवेसी ॥5॥ प्रत्येका मनी विचार एकचि। गुरु समर्थ त्यासाठी ॥ अर्पू जीवन सार्थकतेसी । कर्म दग्ध करण्यासी ॥6॥ कर्म कैसे ठाऊक गुरुसी । ते उमजोनी तो गुरुपदी ॥ प्रत्येकाची स्थिती वेगळी । त्या त्या मिळे भिन्न मार्गासी ॥7॥ गुरु प्रत्येक कर्मासी । गती देती भिन्न मार्गी ॥ हा विश्वास शिष्यासी । त्याने शरण गुरुपदी ॥8॥ बावन दिवस अखंडी । गुरुचरित्र पारायणी ॥ प्रत्येकाची भिन्न पाळी । जो तो करितो पारायणासी ॥9॥ गुरु लक्ष सर्वाभूती । दृश्य आणि अदृश्यी ॥ दक्षता वर्णू कशी । बुध्दी नाही मज जवळी ॥10॥ सूचना पाट वाजताचि । गुरु पाहती येऊनी॥ सूचना ती कशाची । विचारिती त्या शिष्यासी ॥11॥ पारायणा येणार शिष्य । त्याचे पोथी पाट॥ फुले साहित्य सर्व । तयार असे गुरु मठासी ॥12॥ नुसते करा पारायणासी। ताण नाही कोणावरी ॥ पारायण संपता क्षणी । चहा कॉफी मिळे त्यासी ॥13॥ आयते मिळे सर्वही । करा अनुष्ठान मठासी ॥ साधुनी ही पर्वणी । विमान गाठा स्वर्ग मोक्षासी ॥14॥ गणपती उत्सवी । गजानन विजय पारायणी ॥ पाटासह तयारी । पोथी तिही पाटावरती ॥15॥ नुसते करा पारायणासी । आनंद ठेवा मनी ॥ गुरुची इच्छा एकचि । प्रसन्न करा मनासी॥16॥ स्वतंत्र खोली स्त्रियांसी । झाडूनी तयार आधी ॥ सर्वा आधी उठूनी। पाट मांडण्या सांगती ॥17॥ शिष्या येण्या आधी । झाडझूड सर्वही ॥ सकाळची आरती । व्हावी साडे सहा सातासी॥18॥ दक्षता किती तरी । क्षेत्र स्वच्छ राखण्यासी ॥ लेखणीत नाही शक्ती । अनुभव लागे पाठी ॥ 19॥ चाले पारायण अखंडी । अखंड चाले चहा कॉफी ॥ कळे गुरु शक्ती त्यातूनी ॥ लक्ष अखंड गुरुचे कर्मी ॥20॥ दत्तमूर्ताी उभी जशी । विश्रांती ना त्या कधी ॥ विश्रांती ना ठाऊकी। गुरु तत्पर शिष्य कामी ॥21॥ भोजन सरबत कॉफी । तेही घेण्या विसरती ॥ वेळ मिळता शिष्या सोडूनी । करिती स्वदेह कार्यासी ॥22॥ ती तळमळ शिष्यासाठी । वर्णन करणे अशक्यचि ॥ सकाळचा फराळ घेती रात्री । पाट ताट मांडल्यावरी ॥23॥ कॉफीची काय गती । तयार असून मग्न शिष्यी ॥ चार चार तास तसेचि । शिष्य गेल्यावर घेती कॉफी ॥24॥ आधी चार गोष्टी शिष्यासी । मग शरीर धर्म सर्वही ॥ ही तळमळ गुरुची । अनुभवे कळे ज्याचे त्यासी ॥25॥ चटपट पंचरी नाही काही । शुध्द सात्त्वि भाव अंतरी ॥ त्याने प्रेरणा सर्वासी । वर्णन करे कशी लेखणी ॥26॥ सात्त्विता नसे बाजारी । श्रध्दे निष्ठे सर्व निर्मिती ॥ किती कर्मा मिळे गती । हे कसे कळेल शिष्यासी ॥27॥ त्याची होता तयारी । अभ्यास करिता घटनी ॥ शिष्या कळे काही । योग्यता वाढे त्याची ॥28॥ ही प्रक्रिया अखंडी । चालू असे दत्तवाडीवरी ॥ अदृश्य घटना कळण्यासी । स्थिरता लागे मनी ॥29॥ प्रत्येक अनुष्ठानी । कर्मा मिळे गती ॥ जाता कर्म सोडूनी । घटना घडती जीवनी ॥30॥ घटनेचा ताण मनी । काही ताण शरीरी ॥ सोडता कर्म शरीरासी । त्रास सतत होई मनी ॥31॥ ऐसे गुरु दत्तवाडीसी । आनंद होतो मनी ॥ जीवनी सार्थकता होई । अनुभव येतो क्षणोक्षणी ॥32॥ सतत वाटते मनी । रहावे त्याच वातावरणी ॥ शुध्द व्हावे या जन्मी । आनंद वाटतो दासासी ॥33॥ गुरुनाथ आरुढ गुरुपीठी । ब्रह्मा विष्णू महेश शक्ती ॥ लोटांगण गुरु तव चरणी । तृप्ती अनुभव तव लीलेतूनी ॥34॥ संकल्प तुमचा तुम्हा ठाऊकी । बांधू नुसती खोली अनुष्ठानाची । सुरवात करिता स्वप्न शिष्यासी । विटांची बांधावी पूर्ण झोपडी ॥35॥ सिमेंट विटा माती । व्यवस्था झाली गुरुसंकल्पी ॥ बुध्दीपलीकडच्या खेळासी । जाणिसी जर पातळी तशी ॥36॥ मान प्रतिष्ठेसाठी खर्च जगी । अपेक्षारहित इथे सर्वही ॥ ज्ञानदान सत्र चाले अखंडी । कंटाळा न देखिला प्रश्नोत्तरी ॥37॥ सांगून न वागले कोणी । पुन: पुन: त्यांना सांगती ॥ जन्मोजन्मीची प्रक्रिया ही । प्रगती करा आहे त्या स्थिती ॥38॥ तीन अश्वशक्ती पंपासी । बसविती दत्तवाडी विहिरीसी ॥ खोदिता विहीर लहान जरी । लागला प्रचंड झरा तळी ॥39॥ कितीही वेळ पंप चालूनी । पाणी न तुटे लहान कुपी ॥ गुरुशक्तीची ही प्रचंड ज्योती । अनुभवितो दास क्षणोक्षणी ॥40॥ श्री गुरुंची अगाध लीला । आनंद वाटतो वर्णिता ॥ गुरुंनी दत्तजयंतीला । प्रवचन दिली प्रेरणा ॥41॥

 

Sadguru Vishnudas Maharaj